श्मशान ते भूमि प्रेतरूप – संत तुकाराम अभंग – 48
श्मशान ते भूमि प्रेतरूप जन ।
सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥१॥
भरतील पोटे श्वानाचिया परी ।
वस्ति दिली घरीं यमदूतां ॥ध्रु.॥
अपूज्य लिंग तेथें अतित न घे थारा ।
ऐसी वस्ती चोरां कंटकांची ॥२॥
तुका म्हणे नाहीं ठावी स्थिति मती ।
यमाची निश्चिती कुळवाडी ॥३॥
अर्थ
ज्या गावामधे परमेश्वराची सेवा व भक्ती घडत नाही ते गाव स्मशानवत व तेथील रहिवाशी प्रेतरूप असतात .कुत्र्याप्रमाने भटकुन ते पोट भारतात, त्यामुळे त्यांच्या घरामधे यमदूताचि वस्ती असते .जेथे हरिहरांची पूजा भक्ति घडत नाही, ते स्थान चोरांचे, नास्तिकांचे वस्तीस्थान बनते .तुकाराम महाराज म्हणतात, त्यांना आपले हित विठ्ठलभक्तीत आहे हे न कळाल्यामुळे ते यमाचे कुळे बनले आहेत .
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
श्मशान ते भूमि प्रेतरूप – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.