जवळी मुखापाशीं – संत तुकाराम अभंग – 479
जवळी मुखापाशीं । असतां नेघे अहर्निशीं ॥१॥
भवनिर्दाळण नाम । विठ्ठल विठ्ठल नासी काम ॥ध्रु.॥
सुखाचें शेजार । करूं कां नावडें घर ॥२॥
तुका म्हणे ठेवा । कां हा न करीच बरवा ॥३॥
अर्थ
अहो हरीचे नाम अगदी मुखाजवळ आहे तरीदेखील तुम्ही रात्रंदिवस त्याचे नाम का घेत नाहीत?विठ्ठलाचे नाम हे संसाराचा निरास करून अनेक कामांचा नाश करणारे आहे.हे नाम सुख मय शेजार आहे,ते तुला का आवडत नाही? तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही हरिनामाचा हा उत्तम प्रकारचा ठेवा जतन करून का ठेवत नाही?
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
जवळी मुखापाशीं – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.