कामातुर चवी सांडी – संत तुकाराम अभंग – 474
कामातुर चवी सांडी । बरळ तोंडीं बरळे ॥१॥
रंगलें तें अंगीं दावी । विष देववी आसडे ॥ध्रु.॥
धनसोसें लागे वेड । ते बडबड शमेना ॥२॥
तुका म्हणे वेसनें दोन्ही । नर्कखाणी भोगावया ॥३॥
अर्थ
कामातूर मनुष्य लोकराज्य सोडून जे मनाला येईल तशी बडबड करत असतो.ज्या विचाराने मन भरलेले असते,तशी चिन्ह मनुष्य आपल्या शरीरावर दाखवितोच.विष पोटात गेले तर मनुष्य आचके देऊ लागतो.धनाच्या लोभाने माणूस वेडा झाला म्हणजे त्याची बडबड थांबत नाही.तुकाराम महाराज म्हणतात स्त्री आणि पैसा हि दोन्ही नरकखाणी भोगावयास लावणारी आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
कामातुर चवी सांडी – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.