शुद्धचर्या हें संताचे – संत तुकाराम अभंग – 472
शुद्धचर्या हें संताचे पूजन । लागतचि धन नाही वित्त ॥१॥
सगुणाचे सोई सगुण विश्रांती । आपणचि येती चोजवीत ॥ध्रु.॥
कीर्तनींच वोळे कृपेचा वोरस । दुरीपणें वास संन्नीधता ॥२॥
तुका म्हणे वर्म सांगतों सवेगे । मन लावा लागें स्वहिताच्या ॥३॥
अर्थ
संतांचे पूजन म्हणजे शुद्ध आचरण करणे हेच आहे, संतांचे पूजन करण्यासाठी काही धन वित्त लागत नाही.हरीची सगुण स्वरूपाच्या भक्तीने सगुण स्वरुपाची विश्रांती आपल्याला मिळते आणि ती विश्रांती आपल्याला शोधत आपोआप आपल्याकडे येते.देव जरी दूर आहे तरी कीर्तनाने कृपाप्रसाद होतो त्यामुळे तो दूर असला,तरी समीपच असतो.तुकाराम महाराज म्हणतात मी हे माझ्या जीवीचे रहस्य तत्परतेने तुम्हाला सांगत आहे.कारण तुम्ही तुमचे जीवन स्वहिताच्या मार्गाकडे लावावे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
शुद्धचर्या हें संताचे – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.