लेकरा आईतें पित्याची – संत तुकाराम अभंग – 471
लेकरा आईतें पित्याची जतन । दावी निजधन सर्व जोडी ॥१॥
त्यापरि आमुचा जालासे सांभाळ । देखिलाचि काळ नाहीं आड ॥ध्रु.॥
भुकेचे संन्नीध वसे स्तनपान । उपायाची भिन्न चिंता नाहीं ॥२॥
आळवूनि तुका उभा पैलथडी । घातली या उडी पांडुरंगें ॥३॥
अर्थ
लेकराला पित्याचे सर्व आहे ते धन तो जाणता झाला की त्याच्या स्वाधीन करतो तेही लेकरांनी काहीही नष्ट करतातअगदी त्याप्रमाणेच देवा तुम्ही आमचा सांभाळ केला आहे काळाचे तोंड देखील आम्ही आतापर्यंत पाहिले नाही तो आम्हाला आडवा देखील आला नाही.भूक लागताच स्तनपान उपलब्ध असेल,तर धावा धाव करावीच लागत नाही.तुकाराम महाराज म्हणतात मी अशा प्रकारे पांडुरंगाला ओवाळून पैलतीरावर उभा राहिलो,तेंव्हा पांडुरंगाने मला जवळ घेण्या करता धाव घेतली.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
लेकरा आईतें पित्याची – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.