दर्पणासी नखटें लाजे – संत तुकाराम अभंग – 469

दर्पणासी नखटें लाजे – संत तुकाराम अभंग – 469


दर्पणासी नखटें लाजे । शुद्ध खिजे देखोनि ॥१॥
ऐसें अवगुणांचे बाधें । दिसे सुदें विपरीत ॥ध्रु.॥
अंधळ्यास काय हिरा । गारां चि तो सारिखा ॥२॥
तुका म्हणे भुंके सुनें । ठाया नेणे ठाव तो ॥३॥

अर्थ

आरश्यामध्ये नकटा माणूस स्वतःचे रूप पाहून लाजतो आणि एखाद्या चांगल्या मनुष्याचे नाक पाहून त्याच्यावर विणाकारण चिडत असतो.अवगुणाची ज्याला बाधा आहे,त्याला वरील उदाहरणा प्रमाणे जे सरळ आहे,ते वाकडे भासते.आंधळ्या माणसाला मौल्यवान हिरा जरी दिला,तरी त्याला गारगोटीच वाटणार.तुकाराम महाराज म्हणतात वाटेल त्या ठिकाणी कुत्रे भुंकते,तशातलाच हा प्रकार आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

दर्पणासी नखटें लाजे – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.