आम्हां हें कौतुक जगा – संत तुकाराम अभंग – 468
आम्हां हें कौतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते ॥१॥
कासयाचा बाध एकाच्या निरोपें । काय व्हावें कोपें जगाचिये ॥ध्रु.॥
अविद्येचा येथें कोठें परिश्रम । रामकृष्णनाम ऐसे बाण ॥२॥
तुका म्हणे येथें खऱ्याचा विकरा । न सरती येरा खोटया परी ॥३॥
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
आम्हां हें कौतुक जगा – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.