अवघा वेंचलों इंद्रियांचे – संत तुकाराम अभंग – 461

अवघा वेंचलों इंद्रियांचे – संत तुकाराम अभंग – 461


अवघा वेंचलों इंद्रियांचे ओढी । जालें तें तें घडी निरोपिलें ॥१॥
असावा जी ठावा सेवेसी विचार । आपुला म्यां भार उतरिला ॥ध्रु.॥
कायावाचामनें तोचि निजध्यास । एथें जालों ओस भक्तीभावें ॥२॥
तुका म्हणे करूं येईल धावणें । तरि नारायणें सांभाळावें ॥३॥

अर्थ

देवा इंद्रियांच्या ओढीने मी जे जे काही कर्म केले ते ते सर्व कर्म तुला निरूपण केले आहे म्हणजे मी तुला सांगितले आहे. देवा तुला आमच्या अशाप्रकारचे सेवेचा ठावा नसावा परंतु मी जे काही घडले ते सर्व तुला निरोपण केले आहे त्यामुळे माझ्या माथ्यावरचा सर्व भार उतरविला आहे. माझ्या काया वाचा व मनाने इंद्रियांच्या ओढीने विषयांचा निजध्यास घेतला होता त्यामुळे मी भक्ती भावाच्या दृष्टीने ओस झालो होतो. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा तुला जर माझ्यासाठी धावून येता आले तर ये आणि माझा सांभाळ कर.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

अवघा वेंचलों इंद्रियांचे – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.