जेवीं नवज्वरें तापलें – संत तुकाराम अभंग – 450

जेवीं नवज्वरें तापलें – संत तुकाराम अभंग – 450


जेवीं नवज्वरें तापलें शरीर । लागे तया क्षीर विषातुल्य ॥१॥
तेवीं परमार्थ जीहीं दुराविला । तयालागीं झाला सन्निपात ॥ध्रु.॥
कामिनी जयाच्या जाहाली नेत्रासी । देखी तो चंद्रासी पीतवर्ण ॥२॥
तुका म्हणे मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची ॥३॥


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

जेवीं नवज्वरें तापलें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.