ढेकरें जेवण दिसे साचें – संत तुकाराम अभंग – 45

ढेकरें जेवण दिसे साचें – संत तुकाराम अभंग – 45


ढेकरें जेवण दिसे साचें ।
नाहीं तरि काचें कुंथाकुंथी ॥१॥
हे ही बोल ते ही बोल ।
कोरडे फोल रुचीविण ॥ध्रु.॥
गव्हांचिया होती परी ।
फके वरी खाऊं नये ॥२॥
तुकां म्हणे असे हातींचें कांकण ।
तयासी दर्पण विल्हाळक ॥३॥

अर्थ
भोजनाच्या तृप्तीनंतर दिलेली ढेकर खरी असते, पण भोजन न करता दिलेली ढेकर हे ढोंग असते .भोजन करुन तृप्तीने दिलेली ढेकर हा अनुभव असतो, तर भोजन न करताच दिलेली ढेकर हे फोलपटा प्रमाणे असते .गव्हाच्या पीठाची पुरणपोळी बनते, म्हणून केवळ पीठ खल्याने पुराणपोळी खाल्ल्याचा अनुभव येत नाही .म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हातात कंकण दिसत आहं तरी आरसा पाहणे हे निरर्थ असते .


हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .


ढेकरें जेवण दिसे साचें – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.