वाटुली पाहातां सिणले – संत तुकाराम अभंग – 442

वाटुली पाहातां सिणले – संत तुकाराम अभंग – 442


वाटुली पाहातां सिणले डोळुले । दाविसी पाउलें कइं वो डोळां ॥१॥
तूं माय माउली कृपेची साउली । विठ्ठले पाहिली वाट तुझी ॥२॥
कां बा मोकलिले कोणा निरविले । कठिण कैसे झाले हृदय तुजे ॥३॥
तुका म्हणे माझ्या असांवल्या बाह्या । तुज क्षेम द्याया पांडुरंगा ॥४॥

अर्थ

देवा तुमची वाट पाहून पाहून माझे डोळे शिणले आहे मजे त्रासले आहेत तुम्ही केव्हा माझ्या डोळ्यांना तुमचे रूप दाखवणार आहात?हे विठाबाई,तू कृपेची सावली देणारी माय माउली आहेस.मी तुझी वाट पाहत आहे. तुम्ही मला का सोडून दिलेत?कुणाच्या हाती सोपविलेत?तुझे हृदय असे कठीण कसे झाले? तुकाराम महाराज म्हणतात अहो देवा माझ्या बहु तुम्हाला क्षेमालिंगन देण्यास फार आसुसलेले आहेत.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


वाटुली पाहातां सिणले – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.