आशाबद्ध जन – संत तुकाराम अभंग – 44
आशाबद्ध जन ।
काय जाणे नारायण ॥१॥
करी इंद्रियांची सेवा ।
पाहे आवडीचा हेवा ॥ध्रु.॥
भ्रमलें चावळे ।
तैसें उचित न कळे ॥२॥
तुका म्हणे विषें ।
अन्न नाशियलें जैसें ॥३॥
अर्थ
प्रपंच्याविषयी आसक्त असणारे जिव परमेश्वराला काय जाणून घेऊ शकतात? त्यांना स्वता:च्या इंद्रियाची सेवा करण्यास आनंद वाटतो .तो भ्रमिष्ट स्वता:च्या जीवनाचे हित जाणु शकत नाही .तुकाराम महाराज म्हणतात, सुग्राम अन्नात विष कालवले असता ते सर्व अन्न वाया जाते, त्या प्रमाणे मनात भोगलालसा असणाऱ्या जीवाचे जीवन व्यर्थ जाते.
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
आशाबद्ध जन – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.
तुकाराम महाराज गाथा
??रामकृष्ण हरी ??
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर भाष्य करणे अवघड आहे. आपण मात्र खूप सोप्या आणि सहज शैलीत भावार्थ मांडत आहात.
??रामकृष्ण हरी ??
धन्यवाद माऊली ?????