पाववील ठाया – संत तुकाराम अभंग – 433
पाववील ठाया । पांडुरंग चिंतिलिया ॥१॥
त्यासी चिंतिलिया मनीं । चित्ता करी गंवसणी ॥ध्रु.॥
पावावया फळ । अंगीं असावें हें बळ ॥२॥
तुका म्हणे तई । सिद्धी वोळंगती पायीं ॥३॥
अर्थ
पांडुरंगाचे चिंतन केले असता आपल्याला जे ठिकाण पाहिजे आहे जे पद पाहिजे आहे त्या ठिकाणी आपल्याला तो पोहोचवतो.मना मध्ये त्याचे चिंतन केले म्हणजे तो चित्ताला आपल्या स्वरूपाने वेढून टाकतो.इच्छिलेले फळ प्राप्त होण्यास आपल्या अंगी भागवत चिंतनाचे बळ पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात असे असेल तर रीध्दी सिद्धी भक्ताची चरण सेवा करतात.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
पाववील ठाया – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.