करी संध्यास्नान – संत तुकाराम अभंग – 430

करी संध्यास्नान – संत तुकाराम अभंग – 430


करी संध्यास्नान । वारी खाउनियां अन्न ॥१॥
तया नाहीं लाभहानी । आदा वेंचाचिये मानीं ॥ध्रु.॥
मजुराचें धन । विळा दोरचि जतन ॥२॥
तुका म्हणे नाहीं । अधीरासी देव कांहीं ॥३॥

अर्थ

काही मनुष्य असे आहेत की ती दररोज स्नानसंध्या करतात परंतु निषिद्ध अन्न खाऊन त्याने केलेल्या सर्व कर्मांचा नाश करतो.अशा मनुष्याला काही लाभही होत नाही व त्याचे नुकसानही होत नाही.जमा खर्च बरोबर होतो.ज्याप्रमाणे मजुराने मजुरी करून मिळवलेले सर्व धन खर्च होते आणि त्याच्या जवळ फक्त विळा आणि गवत बांधण्याचा दोर ऐवढेच राहते.म्हणून ज्याच्यामध्ये अधीरपण आहे त्याला देव प्राप्त होत नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


करी संध्यास्नान – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.