पवित्र सोंवळीं ।
एक तींच भूमंडळीं ॥१॥
ज्यांचा आवडता देव ।
अखंडित प्रेमभाव ॥ध्रु.॥
तींच भाग्यवंतें ।
सरतीं पुरतीं धनवित्तें ॥२॥
तुका म्हणे देवा ।
त्यांची केल्या पावे सेवा ॥३॥
अर्थ
या भुमंडळी संतसज्जनच एक पवित्र, शुद्ध आहेत.त्यांच्या मनात फक्त परमेश्वराविषयीच प्रेम, भक्ति असते.धनद्रव्याने समृद्ध, बुद्धिने तल्लख असे ते संत या जगात भाग्यवंत आहेत .तुकाराम महाराज म्हणतात अशा संतसज्जनाची सेवा केली तर ती देवाला पावते.
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.