योग तप याचि नांवें – संत तुकाराम अभंग – 429
योग तप याचि नांवें । गळीत व्हावें अभिमानें ॥१॥
करणें तें हेंचि करा । सत्य बरा व्यापार ॥ध्रु.॥
तरि खंडे येरझार । निघे भार देहाचा ॥२॥
तुका म्हणे मानामान । हें बंधन नसावें ॥३॥
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
योग तप याचि नांवें – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.