मायबापापुढें लेंकराची – संत तुकाराम अभंग – 428
मायबापापुढें लेंकराची आळी । आणीक हे पाळी कोण लळे ॥१॥
सांभाळा जी माझीं विषमें अनंता । जवळी असतां अव्हेरु कां ॥ध्रु.॥
आणिकांची चाले सत्ता आम्हांवरी । तुमची ते थोरी काय मग ॥२॥
तुका म्हणे आलों दुरोनि जवळी । आतां टाळाटाळी करू नयें ॥३॥
अर्थ
मायबापाच्या पुढे लेकराचे हट्ट चालत असतात माय बापा वाचून इतर कोण त्याचे हट्ट पुरवणारा आहे?अहो देवा,अनंता माझ्या ठिकाणी जी काम क्रोधाची विषम वृत्ती वाढली आहे,ती तुम्ही नाहीशी करा.तुम्ही माझ्या जवळ असून माझा अव्हेर का करता?जर आमच्यावर दुसऱ्या कोणाची सत्ता चालेल, तर मग तुमचा थोर पणा तो काय राहिला? तुकाराम महाराज म्हणतात देवा,मी खूप लांबून तुमच्या जवळ (अनेक योनी फिरून मनुष्यदेहात) आलो आहे आता आपण माझा उद्धार करण्यास टाळाटाळ करू नये.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
मायबापापुढें लेंकराची – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.