देऊंनियां कपाट – संत तुकाराम अभंग – 427

देऊंनियां कपाट – संत तुकाराम अभंग – 427


देऊंनियां कपाट । कीं कोण काळ राखों वाट ॥१॥
काय होईल तें शिरीं । आज्ञा धरोनियां करीं ॥ध्रु.॥
करूं कळे ऐसी मात । किंवा राखावा एकांत ॥२॥
तुका म्हणे जागों । किंवा कोणा नेंदूं वागों ॥३॥

अर्थ

देवा इंद्रियांचे द्वार बंद करून किती दिवस तुझी वाट पाहत राहावे.आता जी आज्ञा तू करशील,ती मी शिरोधार्य करीन.मी काय करू?मला जसे समजते,तसे कार्य करू कि केवळ एकांतात राहू.तुकाराम महाराज म्हणतात देवा आता मी येथे नेहमी जागत राहू की, इतर कोणाला म्हणजे विकारांना येण्या-जाण्यासाठी बंदी घालत राहू की, त्यांची वागणूक बंद करू?


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


देऊंनियां कपाट – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.