सुखवाटे येचि ठायी – संत तुकाराम अभंग – 426

सुखवाटे येचि ठायी – संत तुकाराम अभंग – 426


सुखवाटे येचि ठायी । बहु पायीं संतांचें ॥१॥
म्हणऊनि केला वास । नाहीं नास ते ठायीं ॥ध्रु.॥
न करवे हाली चाली । निवारिली चिंता हे ॥२॥
तुका म्हणे निवे तनु । रज:कणु लागतां ॥३॥

अर्थ

मला संतांच्या पाया जवळच खूप सुख वाटत आहे.येथे सुखाला कधीही नाश नाही म्हणून मी येथेच वास्तव्य केले.आता येथून ढळणे नाही,कसलेही खटाटोप नाहीत म्हणून माझी चिंता नाहीशी झाली. तुकाराम महाराज म्हणतात संतांचे रज: कण जरी शरीराला लागले तरी त्रिविध ताप नाहीसे होतात शरीर विश्रांत पावते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


सुखवाटे येचि ठायी – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.