आम्ही ज्याचे दास – संत तुकाराम अभंग – 421

आम्ही ज्याचे दास – संत तुकाराम अभंग – 421


आम्ही ज्याचे दास । त्याचा पंढरिये वास ॥१॥
तो हा देवांचा ही देव । काय कळिकाळाचा भेव ॥ध्रु.॥
वेद जया गाती । श्रुति म्हणती नेति नेति ॥२॥
तुका म्हणे निज । रूपडें हें तत्त्वबीज ॥३॥

अर्थ

आम्ही ज्याचे दास आहोत तो आमचा मालक पंढरीला वास करतो. तो आमचा मालक देवांचाही देव आहे त्यामुळे आम्हाला कसले आले कळिकाळा चे भेव. ज्याचे वर्णन वेद गातात आणि श्रुती म्हणतात की आम्हाला तो अजूनही कळत नाही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात निज स्वरूपाचे जे तत्व बीज आहे ते पंढरीला वास करणाऱ्या आमच्या मालकाचे म्हणजे पंढरीरायाचे रूप आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


आम्ही ज्याचे दास – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.