तुझा दास मज म्हणती अंकित – संत तुकाराम अभंग – 420

तुझा दास मज म्हणती अंकित – संत तुकाराम अभंग – 420


तुझा दास मज म्हणती अंकित । अवघे सकळिक लहान थोर ॥१॥
हेंचि आतां लागे करावें जतन । तुझें थोरपण तुज देवा ॥ध्रु.॥
होउनी निर्भर राहिलों निंश्चित । पावनपतित नाम तुझें ॥२॥
करितां तुज होय डोंगराची राई । न लागतां कांहीं पात्या पातें ॥३॥
तुका म्हणे तुज काय ते अशक्य । तारितां मशक मज दीना ॥४॥

अर्थ

देवा मी तुझा अंकित दास आहे असे सर्वच लहानथोर म्हणत आहेत.देवा आता तुला हा आपला मोठे पणा राखला पाहिजे.पतितपावन असे तुझे नाव आहे.हे जाणून मी निश्चिंत पणे राहिलो आहे.तुझा पराक्रम असा आहे कि,पापणी लावते न लावते तेवढ्यात तू डोंगराची राई करशील(मोठे पापही नष्ट करशील). तुकाराम महाराज म्हणतात मी तर ऐखाद्या मशका प्रमाणे शुल्लक आहे,दिन आहे असे असताना मला तरणे तुला अश्यक्य आहे का?


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


तुझा दास मज म्हणती अंकित – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.