बाप मेला न कळतां – संत तुकाराम अभंग – 417

बाप मेला न कळतां – संत तुकाराम अभंग – 417


बाप मेला न कळतां । नव्हती संसाराची चिंता ॥१॥
विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुसर्‍याचे काज ॥ध्रु.॥
बाईल मेली मुक्त जाली । देवें माया सोडविली ॥२॥
पोर मेलें बरें जालें । देवें मायाविरहित केलें ॥३॥
माता मेली मज देखतां । तुका म्हणे हरली चिंता ॥४॥

अर्थ

महाराज म्हणतात ज्या वेळी मला संसाराची काहीच चिंता नव्हती त्याचवेळी माझा बाप मेला, माझी बायको मेली मुक्त झाली,सुटली मी पण सुटलो.फार बरे झाले देवाने मला माये पासून सोडविले .माझा पोरगा मेला ते हि बरे झाल.देवाने माये पासूनच सोडवले. तुकाराम महाराज म्हणतात माझी आई माझ्या समक्षच वारली तेही बरे झाले तिचे कसे होईल हि चिंता देखील हरली.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


बाप मेला न कळतां – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.