डोई वाढवूनि केश – संत तुकाराम अभंग – 415

डोई वाढवूनि केश – संत तुकाराम अभंग – 415


डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥१॥
तरी ते नव्हति संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥ध्रु.॥
मेळवूनि नरनारी । शकुन सांगे नानापरी ॥२॥
तुका म्हणे मैंद । नाहीं त्यापासीं गोविंद ॥३॥

अर्थ

असे अनेक लोक आहेत की जे डोक्यावर केस वाढतात व अंगामध्ये भुताचा संचार आणतात.पण तेवढ्याने ते संत होत नाहीत,कारण ती आत्मानुभवाची खूण नसते.काही लोक,पुरुष आणि बायका जमुन अनेक प्रकारचे शकून सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात पण असल्या लबाड, (मैंद)डोंगी माणसाजवळ गोविंद राहत नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


डोई वाढवूनि केश – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.