लोह चुंबकाच्या बळें – संत तुकाराम अभंग – 414

लोह चुंबकाच्या बळें – संत तुकाराम अभंग – 414


लोह चुंबकाच्या बळें । उभें राहिलें निराळें ॥१॥
तैसा तूंचि आम्हांठायीं । खेळतोसी अंतर्बाहीं ॥ध्रु.॥
भक्ष अग्नीचा तो दोरा । त्यासि वांचवी मोहरा ॥२॥
तुका म्हणे अधीलपणें । नेली लांकडें चंदनें ॥३॥

अर्थ

चुंबकाच्या आकर्षणाने लोखंडाची सुई उभी राहते,तसा तू आमच्या आकर्षणाने आताही व बाहेरही उभा राहतोस.दोरा जळणारा आहे,पण तो मोहरा नावाच्या खड्याला गुंडाळून टाकला तर तो जळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात चंदनाच्या वृक्षाच्या संगतीने इतर वृक्षांचे पूर्वीचे गुणधर्म जाऊन त्यांना चंदनाचा सुगंधी गुण येतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


लोह चुंबकाच्या बळें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.