हाकेसरिसी उडी – संत तुकाराम अभंग – 413

हाकेसरिसी उडी – संत तुकाराम अभंग – 413


हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥
ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥ध्रु.॥
करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥२॥
तुका म्हणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥३॥

अर्थ

भक्त प्रल्हादाने आर्ततेने नारायणाला हाक मारताच नारायण स्तंभ फोडून स्तंभातून प्रकट झाले.अशी कृपावंत माऊली माझ्या विठाई माऊलीहून दुसरी कोण आहे?तिचे स्मरण करताच प्रेमाने धावत येऊन ती भक्ताला मिठी मारते. तुकाराम महाराज म्हणतात हरीचेनाम गीतात आळवावे.त्याने सायुज्य मुक्ती मिळते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


हाकेसरिसी उडी – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.