असो आतां किती – संत तुकाराम अभंग – 410
असो आतां किती । तुज यावें काकुलती ॥१॥
माझें प्रारब्ध हें गाढें । तूं बापुडें तयापुढें ॥ध्रु.॥
सोडवीन आतां । ब्रीदें तुझे पंढरीनाथा ॥२॥
तुका म्हणे बळी । गांढयाचे कान पिळी ॥३॥
अर्थ
देवा आता तुला किती वेळा काकुळतीला यावे?माझे प्रारब्ध फारच बलवान आहे त्या पुढे तू सुद्धा दुबळा ठरतोस.हे पंढरीनाथा तू आता धारण केले तुझे पतितपावन दीनदयाला दिनबंधू हि ब्रिदे मी तुला सोडून द्यायला लगीन. तुकाराम महाराज म्हणतात जो बळी असतो तो (गांढ्याचे)दुर्बळाचे कान पिळतो,असा नियमाच आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
असो आतां किती – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.