दुर्जनासि करी साहे – संत तुकाराम अभंग – 41
दुर्जनासि करी साहे ।
तो ही लाहे दंड हे ॥१॥
शिंदळीच्या कुंटणी वाटा ।
संग खोटा खोट्याचा ॥ध्रु.॥
येर येरा कांचणी भेटे ।
आगी उठे तेथूनी ॥२॥
तुका म्हणे कापूं नाकें ।
पुढें आणिकें शिकविती ॥३॥
अर्थ
दुर्जनाना जे मदत करतात ते शिक्षेस पात्र ठरतात.एखादी स्त्री वेश्येच्या सानिध्यात राहिल्याने शिंदळकी ( दुर्वर्तन) करू लागते .दोन लाकडी एकमेकांवर घासली गेली की अग्निचि निर्मिति होते.वाइटाच्या संगतिने चांगल्या मनुष्याची वृत्ती बिघडते; तुकाराम महाराज म्हणतात की, अशा दृष्टांचि नाके आम्ही कापून काढू म्हणजे त्यांच्या पासुन इतरांचे नुकसान होणार नाही.
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
दुर्जनासि करी साहे – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.