सोसोनि विपत्ती – संत तुकाराम अभंग – 408
सोसोनि विपत्ती । जोडी दिली तुझे हातीं ॥१॥
त्याचा हाचि उपकार । अंतीं आम्हाशीं वेव्हार ॥ध्रु.॥
नामरूपा केला ठाव । तुज कोण म्हणतें देव ॥२॥
तुका म्हणे हरी । तुज ठाव दिला घरीं ॥३॥
अर्थ
देवा मी आज पर्यंत आणि प्रकारच्या विपत्ती सोसल्या आणि सर्व लाव तुझ्या हाती दिला आहे. अखेर आम्हांला सोडून दिलेस त्याचेच का उपकार फेडलेस?अरे आम्हीं आमच्या भक्तीने तुला नाव आणि रूप दिले.तुला सगुण साकार केले.नाही तर तुला देव कोणी म्हंटले असते? तुकाराम महाराज म्हणतात नाम रूपाच्या घराचा आश्रय आम्हीच तुला दिला आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
सोसोनि विपत्ती – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.