एका बीजा केला नास – संत तुकाराम अभंग – 406

एका बीजा केला नास – संत तुकाराम अभंग – 406


एका बीजा केला नास । मग भोगिले कणीस ॥१॥
कळे सकळां हा भाव । लाहानथोरांवरी जीव ॥ध्रु.॥
लाभ नाहीं फुकासाठीं । केल्यावीण जीवासाठीं ॥२॥
तुका म्हणे रणीं । जीव देतां लाभ दुणी ॥३॥

अर्थ

शेतकरी भूमीमध्ये एक बीज पेरून त्याचा नाश करतो पण खरे तर त्या एक बीज यामुळेच अनेक बीज उत्पन्न होतात मग त्या शेतकऱ्याला अनेक कंसांचा लाभ होतो.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही गोष्ट कळतच असते.आपला जीव खर्ची घातल्या शिवाय फुकट काही मिळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात रणा मध्ये शूर वीर जीव गमवतो पण त्याला दुप्पट लाभ होतो.तो म्हणजे इहलोकी कीर्ती मिळते आणि परलोकी सद्गती प्राप्त होते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


एका बीजा केला नास – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.