माया तेचि ब्रम्ह ब्रम्ह तेंचि – संत तुकाराम अभंग – 40

माया तेचि ब्रम्ह ब्रम्ह तेंचि – संत तुकाराम अभंग – 40


माया तेचि ब्रम्ह ब्रम्ह तेंचि माया ।
अंग आणि छाया जयापरी ॥१॥
तोडितां न तुटे सारितां निराळी ।
लोटांगणांतळीं हारपती ॥ध्रु.॥
दुजें नाहीं तेथें बळ कोणासाठीं ।
आणिक ते आटी विचाराची ॥२॥
तुका म्हणे उंच वाढे उंचपणें ।
ठेंगणीं लवणें जैसीं तैसीं ॥३॥

अर्थ
माया म्हणजे ब्रम्ह आहे आणि ब्रम्‍ह म्हणजेच माया आहे यांचा संबंध देह आणि सावली यांच्या सारखा आहे.देहाचि सावली शस्राच्या अघाताने तुटत नाही, ती सावली देहाला सोडून दूर सरत नाही,लोटांगण घातले असता देहाखाली ती नाहीशी होते.ब्रम्ह आणि माया एकरूप असतील तर तेथे विचाराच्या बळाचा वापर कश्यासाठी करायचा.तुकाराम महाराज म्हणतात जसा देह उंच बुटका असेल तशी सावली असते, लोटांगनाने ती नाहिशी होते तशे ब्रम्हाला लोटांगण घातले, शरण गेले असता मायाही नाहिशी होते.


हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .


माया तेचि ब्रम्ह ब्रम्ह तेंचि – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.