संत तुकाराम अभंग

आपुलिया हिता जो असे जागता – संत तुकाराम अभंग – ४

आपुलिया हिता जो असे जागता – संत तुकाराम अभंग – ४


आपुलिया हिता जो असे जागता ।
धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक ।
तयाचा हरीख वाटे देवा ॥ध्रु.॥
गीता भागवत करिती श्रवण ।
अखंड चिंतन विठोबाचें ॥२॥
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा ।
तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥३॥

अर्थ
ज्याला आपल्या हिताची चिंता असते, ज्याला आपले हित कळते त्याचे माय बाप धन्य आहेत.ज्या कुळामधे सात्विक वृत्तीची मूली – मुले जन्माला येतात त्या कुळाविषयी परमेश्वरालादेखिल हरिख वाटतो .अशी सात्विक वृत्तीची मुले गीता-भागवत श्रवण करतात, विठ्ठलाचे अखंड चिंतन करतात .तुकाराम महाराज म्हणतात अश्या लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्या सारखा भाग्यवान मीच ठरेल .


आपुलिया हिता जो असे जागता – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *