मज संतांचा आधार ।
तूं एकलें निर्वीकार ॥१॥
पाहा विचारूनि देवा ।
नको आम्हांसवें दावा ॥ध्रु.॥
तुज बोल न बोलवे ।
आम्हां भांडायाची सवे ॥२॥
तुका म्हणे तरी ।
ऐक्यभाव नुरे उरी ॥३॥
अर्थ
देवा मला फक्त एकट्या संतांचा आधार आहे, तू तर निर्विकार आहेस. देवा स्वतःशीच या गोष्टीचा विचार करून तू पहा विनाकारण आमच्याबरोबर दावा करू नकोस. देवा आणि तुला एक शब्ददेखील बोलायची सवय नाही परंतु आम्हाला नेहमी भांडायची सवय आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा अरे तुझ्या स्वरूपाचे ठिकाणी ऐक्यभाव म्हणजे जीव ब्रम्ह ऐक्यभाव देखील राहत नाही मग आता सांग आपण एकमेकांशी संवाद कसा साधायचा. (या अभंगांमध्ये तुकाराम महाराजांनी देवाच्या द्वैत स्वरूपाचे आवड सांगितलेली केली आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.