एक भाव चित्तीं ।
तरीं न लगे कांहीं युक्ती ॥१॥
कळों आलें जीवें ।
मज माझियाचि भावें ॥ध्रु.॥
आठवचि पुरे ।
सुख अवघें मोहरे ॥२॥
तुका म्हणे मन ।
पूजा इच्छी नारायण ॥३॥
अर्थ
जर देवाविषयी मनामध्ये एकनिष्ठ शुद्ध भक्तिभाव असेल तर इतर कोणत्याही प्रकारची युक्ति देवाची प्राप्ती करण्यासाठी करावी लागत नाही.
हे मर्म मला,माझ्याच शुध्द भावामुळे अगदी जीवा पासून कळले आहे.देवाची सतत आठवण ठेवली तरी पुरे त्या योगाने सर्व सुखाचा अनुभव येतो. तुकाराम महाराज म्हणतात आपले चित्त त्याच्याकडे लागले तर नारायणाला खरोखर तेच आवडते इतर जप,तप, उपवास,तीर्थयात्रा आदी साधनांचा काही उपयोग नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.