जरी मी पतित नव्हतों देवा ।
तरि तूं पावन कैंचे तेंव्हा ॥१॥
म्हणोनि माझें नाम आधीं ।
मग तूं पावन कृपानिधी ॥ध्रु.॥
लोहो महिमान परिसा ।
नाहीं तरीं दगड जैसा ॥२॥
तुका म्हणे याचकभावें ।
कल्पतरु मान पावे ॥३॥
अर्थ
अरे देवा मी जर पतित नसतो तर पतीतांना पावन करण्यासाठी तू पावन आहेस असे तुला कोण म्हटले असते? म्हणुन माझे पातीताचे नाव आधी आहे व मग तू पावन, कृपानिधी आहेस.(पतितपावन).लोखंडामुळे परिसाचा महिमा वाढलेला आहे.लोखंड नसते ते परीस म्हणजे एक नुसता दगड झाला असता. तुकाराम महाराज म्हणतात याचना करणारा आहे म्हणून कल्पतरू इच्छिलेले देतो,असा मोठेपणा त्या वृक्षाला मिळाला आहे.अर्थात विठ्ठलाला संतांमुळेच मोठे पण मिळाला आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.