मन गुंतलें लुलयां ।
जाय धांवोनि त्या ठाया ॥१॥
मागें परतवी तो बळी ।
शूर एक भूमंडळीं ॥ध्रु.॥
येऊनियां घाली घाला ।
नेणों काय होईल तुला ॥२॥
तुका म्हणें येणें ।
बहु नाडिले शाहाणे ॥३॥
अर्थ
हे मन कसे विषयाच्या ठिकाणी गुंतले आहे ते पहा सारखे विषयाकडेच ते धाव घेते.जो या मनाला मागे खेचू शकतो,तो या जगात खरा शूर आहे.हे मन ज्यावेळेस विषय सक्तीचा घाला घालील ,त्या वेळेस तुझी दशा काय होईल ,ते कळणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात आज पर्यंत या मनाने जगात कित्येक शहाण्या लोकांना नाडले(फसविले) आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.