कृपावंत किती ।
दीन बहु आवडती ॥१॥
त्यांचा भार वाहे माथां ।
करी योगक्षेमचिंता ॥ध्रु.॥
भुलो नेदी वाट ।
करीं धरूनि दावी नीट ॥२॥
तुका म्हणे जीवें ।
अनुसरल्या एक भावें ॥३॥
अर्थ
भक्त जणहो पहा हा देव किती कृपाळू आहे त्याला केवळ दिन भक्तच आवडतात.त्यांच्या संसाराचा सर्व भार आपणच घेऊन त्यांच्या योग क्षेमाची चिंता तोच करतो. भक्त ऐखाद्यावेळी चुकले आणि आडमार्गाला लागले तर त्यांना हाताला धरून सरळ मार्गाला आणतो. तुकाराम महाराज म्हणतात जे भक्त एकनिष्ठपणाने देवाला अनुसरतात,त्यांच्यासाठी तो वर मी सांगिलेल्या सर्व गोष्टी करतो.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.