विठ्ठल नावाडा फुकाचा – संत तुकाराम अभंग – 391
विठ्ठल नावाडा फुकाचा ।
आळविल्या साठी वाचा ॥१॥
कटीं कर जैसे तैसे ।
उभा राहिला न बैसे ॥ध्रु.॥
न पाहे सिदोरी ।
जाती कुळ न विचारी ॥२॥
तुका म्हणे भेटी ।
हाका देतां उठाउठीं ॥३॥
अर्थ
हा भव समुद्र तरून जाण्यासाठी विठ्ठल नावाचा फुकटचा नावाडी आपल्याला लाभला आहे त्याला जर आपल्या वाचणे आपण आळविले तर तो लगेच आपल्या मदतीसाठी धावून येतो. हा देव कटे वर हात ठेऊन उभाचा उभा राहिलेला आहे, कायम सज्ज कधीहि बसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हा भक्तांच्या पाप पुण्याची शिदोरी पाहत नाहि, त्यांची जात बरी वाईट अगर कुळ उच्च नीच आहे,असा विचार करत नाही.त्याच्या नावाने हाक मारली की तो ताबडतोब भेट देतो.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
विठ्ठल नावाडा फुकाचा – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.