आपुलें तों कांहीं – संत तुकाराम अभंग – 390
आपुलें तों कांहीं ।
येथें सांगिजेसें नाहीं ॥१॥
परि हे वाणी वायचळे ।
छंद करविते बरळे ॥ध्रु.॥
पंचभूतांचा हा मेळा ।
देह सत्यत्वें निराळा ॥२॥
तुका म्हणे भुली ।
इच्या उफराटया चाली ॥३॥
अर्थ
या प्रपंचामध्ये एखादी गोष्ट आपली आहे असे सांगण्यासारखी एकही गोष्ट किंवा काहीच नाही म्हटले तरी चालेल, असे काहीही नाही. परंतु हे सर्व माहीत आहे तरी देईल वाणीला व्यर्थच ‘मी आणि माझे’ असे म्हणण्याचे चाळे लागले आहे छंद लागलेला आहे आणि ती व्यर्थ काहीतरी बरळत असते. हा देह पंच भुतांचा मेळ आहे आणि सत्य काय असेल तर आत्मा आहे तो आत्मा आणि देह हे निराळे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात परंतु वाणीला “मी आणि माझे” असे म्हणण्याची सवयच लागलेली आहे खरेतर हे सर्व उफराटे आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
आपुलें तों कांहीं – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.