परिमळ म्हणूनी चोळूं – संत तुकाराम अभंग – 39
परिमळ म्हणूनी चोळूं नये फूल ।
खाऊं नये मूल आवडतें ॥१॥
मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद ।
यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥२॥
कर्मफळ म्हणुनी इच्छूं नये काम ।
तुका म्हणे वर्म दावूं लोकां ॥३॥
अर्थ
फुले सुगंधी असता त्याचा वास घेण्या करता त्याचा चोळामोळा करू नये, गोजिरे मूल आपल्याला आवडते तर ते आपण खात नाही.मोत्याचे पाणी निर्मळ आहे म्हणून मोती चाखु नये, विविध वाद्य मधुर वाजतात म्हणून ती फोडुन पाहू नये. तुकाराम महाराज म्हणतात तसेच कर्म केल्या नंतर त्याच्या फलाची अपेक्षाहि करू नये, हेच भक्तीचे वर्म आहे.
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
परिमळ म्हणूनी चोळूं – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.