हेचि तुझी पूजा – संत तुकाराम अभंग – 389

हेचि तुझी पूजा – संत तुकाराम अभंग – 389


हेचि तुझी पूजा ।
आतां करीन केशीराजा ॥१॥
अवघीं तुझींच ही पदें ।
नमस्कारीन अभेदें ॥ध्रु.॥
न वर्जीत दिशा ।
जाय तेथेंचि सरिसा ॥२॥
नव्हे एकदेशी ।
तुका म्हणे गुणदोषीं ॥३॥

अर्थ

हे केशिराजा आता मी तुझी अशाप्रकारे पूजा करणार आहे.जे काही समोर दिसते ते तुझे स्वरूप आहे असे समजून मी अभेद बुद्धीने त्याला नमस्कार करीन.कोणतीही दिशा वर्ज्य न करता जिकडे जाईन तिकडे तुझ्या सरस अश्या रुपाला जाणीन. तुकाराम महाराज म्हणतात मी कधीही कोणत्याही गोष्टीत जे गुणदोष असतील,त्याकडे लक्ष देणार नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


हेचि तुझी पूजा – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.