वरीवरी बोला रस ।
कथी ज्ञाना माजी फोस ॥१॥
ऐसे लटिके जे ठक ।
तयां इह ना पर लोक ॥ध्रु.॥
परिस एक सांगे ।
अंगा धुळीही न लगे ॥२॥
तुका म्हणे हाडें ।
कुतर्या लाविलें झगडें ॥३॥
अर्थ
वरवर ब्रम्हज्ञानाचा किंवा ज्ञानाच्या कितीही रसभरीत बोल बोलले तरी अनुभवाचुन ते बोल टरफला सारखे आहेत.अशा ठक लोकांना इह लोकात सुख मिळत नाही व परलोकातही चांगली गती मिळत नाही.दुसऱ्याने सांगितलेलं ऐकून जो तेच बडबडतो त्याला परमार्थाचा अंशही लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात असे नुसतेच शब्द वाचाळपाणाने बोलने,म्हणजे हाडासाठी कुत्री भांडतात तशी भांडणे अशी अवस्था विद्वानांची होत असतात.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.