भाव तैसें फळ – संत तुकाराम अभंग – 387

भाव तैसें फळ – संत तुकाराम अभंग – 387


भाव तैसें फळ ।
न चले देवापाशीं बळ ॥१॥
धांवे जातीपाशीं जाती ।
खुण येरयेरां चित्तीं ॥ध्रु.॥
हिरा हिरकणी ।
काढी आंतुनि आइरणी ॥२॥
तुका म्हणे केलें ।
मन शुद्ध हें चांगलें ॥३॥

अर्थ

ज्याचा जसा भक्तांचा भक्तिभाव असेल तसाच देव त्या भक्तांसाठी होत असतो बळेच शक्ती दाखवून देव प्रसन्न करता येत नाही.जात जाती कडे धावते कारण एका जातीच्या माणसांना परस्परांची खुण कळते.खरा हिरा ऐरणीवर ठेऊन त्याच्या वर घाव घातला,तरी तो फुटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हिरा असो, हिरकणी असो,तो ऐरणीत शिरतो.मन असे हिऱ्यासारखे शुद्ध करावे ते फुटता कामा नये.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


भाव तैसें फळ – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.