पूजा पुज्यमान – संत तुकाराम अभंग – 386

पूजा पुज्यमान – संत तुकाराम अभंग – 386


पूजा पुज्यमान ।
कथे उभे हरीजन ॥१॥
ज्याची कीर्ती वाखाणिती ।
तेथें ओतली ती मुर्ती ॥ध्रु.॥
देहाचा विसर ।
केला आनंदें संचार ॥२॥
गेला अभिमान ।
लाज बोळविला मान ॥३॥
शोक मोह चिंता ।
यांची नेणती ते वार्ता ॥४॥
तुका म्हणे सखे ।
विठोबाचि ते सारिखे ॥५॥

अर्थ

हरी कथे मध्ये जे हरिभक्त उभे आहेत ते खरोखर पूज्य आहेत पूज्यमान आहेत.ज्या हरीची कीर्ती ते वाखाणित आहेत,तो हरीच त्यांच्या शरीरात मूर्तिमंत वास करीत आहे.त्यांच्या ठिकाणी देहाची आठवण सुद्धा नाही.आणि केवळ शुद्ध आनंदात ते मग्न आहेत.त्यांना देहाचा अभिमान नाही.हरीनाम घेण्यात लाज नाही,आणि मानसन्मानाचा विचार तर त्यांनी हाकलून दिला आहे.ऐवढेच काय शोक मोह चिंता यांचे नावही ते जाणत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात माझे सखे हरीभक्त खरोखर प्रत्यक्ष विठ्ठलासारखेच आहेत.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


पूजा पुज्यमान – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.