वंदीन मी भूतें – संत तुकाराम अभंग – 385
वंदीन मी भूतें ।
आतां अवघीचि समस्तें ॥१॥
तुमची करीन भावना ।
पदोपदीं नारायणा ॥ध्रु.॥
गाळुनियां भेद ।
प्रमाण तो ऐसा वेद ॥२॥
तुका म्हणे मग ।
नव्हे दुजियाचा संग ॥३॥
अर्थ
यापुढे आता या भुतलावर जी काही भूत मात्र आहेत ती सर्व देवाचीच रुप समजून त्यांना मी वंदन करेन.अहो नारायण सर्व प्राणीमात्र म्हणजे तुम्हीच आहात अशी भावना मी धरीन.लहानमोठा भेद बाजूला सारून पदोपदी मी सर्वत्र तुम्हांला पाहीन. तुकाराम महाराज म्हणतात याविषयी वेद मला प्रमाण आहेत.असे झाल्यावर कोणताही दुजेपणा मनात उत्पन्नच होणार नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
वंदीन मी भूतें – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.