काय नव्हे करितां तुज ।
आतां राखें माझी लाज ॥१॥
मी तों अपराधाची राशी ।
शिखा अंगुष्ट तोंपाशीं ॥ध्रु.॥
त्राहें त्राहें त्राहें ।
मज कृपादृष्टी पाहें ॥२॥
तुका म्हणे देवा ।
सत्य घ्यावी आतां सेवा ॥३॥
अर्थ
देवा तुला काय करता येणार नाही,म्हणून माझे लज्जा रक्षण कर. हे काम तर तुला मुळीच कठीण नाही.मी तर अपराधाची मूर्ती आहे.देवा, माझ्या कडे कृपा दृष्टीने पहा आणि माझे रक्षण कर ,असे मी त्रिवार सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात आता मज कडून खरी सेवा करुन घे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.