आतां पुढें धरीं – संत तुकाराम अभंग – 383
आतां पुढें धरीं ।
माझे आठव वैखरी ॥१॥
नको बडबडूं भांडे ।
कांहीं वाउगें तें रांडें ॥ध्रु.॥
विठ्ठल विठ्ठल ।
ऐसे सांडुनियां बोल ॥२॥
तुका म्हणे आण ।
तुज स्वामीची हे जाण ॥३॥
अर्थ
हे माझी वैखरी वाणी तू आता यापुढे सतत हरिनामाचे स्मरण करत रहा.हे रांडे तू हरिनामा वाचून व्यर्थ काहीही बडबड करत जाऊ नकोस.विठ्ठल विठ्ठल हे नामस्मरण सोडून व्यर्थ बडबड करशील तर,तुकाराम महाराज म्हणतात तुला तुझा स्वामीविठ्ठलाची शपथ आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
आतां पुढें धरीं – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.