ओनाम्याच्या काळें – संत तुकाराम अभंग – 382

ओनाम्याच्या काळें –  संत तुकाराम अभंग – 382


ओनाम्याच्या काळें ।
खडें मांडविलें बाळें ॥१॥
तेंचि पुढें पुढें काई ।
मग लागलिया सोई ॥ध्रु.॥
रज्जु सर्प होता ।
तोंवरीन कळतां ॥२॥
तुका म्हणे साचें ।
भय नाहीं बागुलाचें ॥३॥

अर्थ

शिक्षक मुलांना शिकवण्यासाठी खडे मांडतात व खडे मांडून मुलांना धडे शिकवतात.आणि मुले खडे टाकून देतात खड्यांना वाचूनच त्यांना आकडे आणि अक्षरे ओळखता येतात. तसेच दोरी हि दोरीच आहे,असे जो पर्यंत समजत नाही तो पर्यंत दोरीवर सापाचा भास होतो. तुकाराम महाराज म्हणतात बागुल बुवा मुळात कोठेच नाही हे कळते तेंव्हा त्या बागुल बुवाचे भय राहत नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.