मुक्त कासया म्हणावें – संत तुकाराम अभंग – 381
मुक्त कासया म्हणावें ।
बंधन तें नाहीं ठावें ॥१॥
सुखें करितों कीर्तन ।
भय विसरलें मन ॥ध्रु.॥
देखिजेना नास ।
घालूं कोणावरी कास ॥२॥
तुका म्हणे साह्य ।
देव आहे तैसा आहे ॥३॥
अर्थ
मुक्ती कशाला म्हणावे बंधन कशाला म्हणावे हे मला कळत नाही कारण स्वरुपत आहेच मी मुक्त आहे त्यामुळे मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठी किंवा बंधनातून मुक्त होण्यासाठी मला काही प्रयत्न करावे लागत नाही.माझी अशीच सुखरूप स्थिती झाली आहे आणि त्या स्थितीत मी कीर्तन करत आहे.माझे मन भयाला पूर्ण पणे विसरून गेले आहे.नाश करण्याला योग्य अशी कोणतीच वस्तू मला माझी पुढे दिसत नाही.तर कोणाचा नाश करण्यासाठी मी कास बळकट करून सज्ज होऊ? तुकाराम महाराज म्हणतात सर्वोतपरी साहय्य करणारा देव अद्वैतपणे जसा आहे तसा आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.