लावुनि काहाळा – संत तुकाराम अभंग – 380

लावुनि काहाळा – संत तुकाराम अभंग – 380


लावुनि काहाळा ।
सुखें करितों सोहोळा ॥१॥
सादावीत गेलों जना ।
भय नाहीं सत्य जाणां ॥ध्रु.॥
गातां नाचतां विनोदें ।
टाळघागरीयांच्या छंदें ॥२॥
तुका म्हणे भेव ।
नाहीं पुढें येतो देव ॥३॥

अर्थ

झांज वाजून मोठ्या आनंदाने मी भजनाचा सुखसोहळा करीत आहे.आणि लोकांना मी अशी साद देत आहे की,अहो तुम्हीं जर हरीचे भजन केले,तर तुम्हांला खरोखरच कोणाचेही भय नाही.हरीचे गुणानुवाद गाताना मी पायात चाळ बांधून व हातात टाळ घेऊन तालामध्ये मोठ्या कौतुकाने नाचत आहे. तुकाराम महाराज म्हणतात आणि पहा,पहा, या मध्ये कोणतेही भय नाही आणि देव प्रत्येक्ष समोर येत आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.