तुझे थोर थोर – संत तुकाराम अभंग – 379

तुझे थोर थोर – संत तुकाराम अभंग – 379


तुझे थोर थोर ।
भक्त करिती विचार ॥१॥
जपतपादि साधनें ।
मज चिंतवेना मनें ॥ध्रु.॥
करुणावचनें ।
म्यां भाकावीं तुम्हां दीनें ॥२॥
तुका म्हणे घेई ।
माझें थोडें फार ठायीं ॥३॥

अर्थ

अहो देवा तुमचे थोर भक्त तुमच्या स्वरूपाचा विचार करतात.आणि जप,तप इत्यादी साधनेही ते करतात.पण मी इतका अज्ञ आहे की माझे मन त्या साधनांचा विचारसुद्धा करू शकत नाही.मी सर्व बाबतीत अतिशय दुबळा आहे.म्हणून मला ऐवढेच कळते कि,काकुळतीस येऊन केवळ तुमची प्रार्थना करावी. तुकाराम महाराज म्हणतात अहो देवा, मज कडू जी काही थोडी फार वेडीवाकडी सेवा होत असेल,तिचा आपण स्वीकार करावा.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.